मनोगत
ग्रामस्वराज्यावरील हा विशेषांक मोहन हिराबाई हिरालाल ह्यांच्या कार्यास समर्पित आहे. ह्याविषयी आमचे मित्र सोपान जोशी ह्यांच्याशी होत असलेल्या चर्चेतून निघाले की अंकाचा आवाका वाढवायचा तर ह्यात महाराष्ट्राबाहेरील अनुभवदेखील यायला हवे. अनुषंगाने हिंदी भाषेतील लेखही ह्या अंकात समाविष्ट झाले. त्याची जुळवाजुळव करण्यात वेळ गेल्याने एरवी एप्रिलमध्ये प्रकाशित होणारा अंक आपल्यापर्यंत पोहोचण्यास विलंब झाला, त्याबद्दल दिलगीर आहोत. …